ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी

 

खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी सुरु आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात या दोघांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाले होते. त्यासंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. तर वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात एक कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते, त्याबाबत विचारणा केली जाणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली जात आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार वर्षा राऊत आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मुलगी, जावई आणि संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते. वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत आज त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि जमीन व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

Team Global News Marathi: