‘मोदी-ठाकरेंच्या बंद खोलीतील भेटीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’ मनसे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग आणि चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. एकूण १२ विविध मुद्द्यावर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यातच आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करून टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

 

यावं भेटीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

Team Global News Marathi: