शिवसेनेने छापलेल्या उर्दू कॅलेंडरमुळे नवा वाद,भाजपने लगावला टोला

शिवसेनेने छापलेल्या उर्दू कॅलेंडरमुळे नवा वाद,भाजपने लगावला टोला

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून आघाडीचे सरकार स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या मित्रपक्षाने आणि आता विरोधात असलेल्या भाजपाने हिंदुत्वादाच्या मुद्यावर चिमटा काढला आहे. शिवसेनेच्या वडाळा शाखेने नववर्षाच्या निमित्ताने काढलेले ऊर्दू भाषेतील कॅलेंडर. हे कॅलेंडर व त्यातील मजकुरावरून भाजपने शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली आहे.

हाच मुद्दा पकडत भाजपचे आमदार व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे कॅलेंडर शेअर करत शिवसेनेला टोला लगावला आहे. या कॅलेंडर काही मोजके मराठी शब्द वगळता इतर मजकूर ऊर्दू व इंग्रजी भाषेत आहे. त्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे ‘जनाब’ असे लिहिण्यात आले आहे. याचबरोबर अन्य काही उल्लेखांवरून भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या विभागरमुखांनी अजान स्पर्धा आयोजित केले होते. आता तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावापुढील ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद देखील काढून टाकले आहे. तारखा, चंद्रोदय, सूर्योदय मुस्लिम कॅलेंडरनुसार दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस केले गेले आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: