“महाराष्ट्र सरकारमुळेच इंधनाचे दर जास्त झालेत” चंद्रकांत पाटलांचा जावई शोध

 

देशात कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलेले असताना दुसरीकडे इंधनदरवाढीवरून सामना नागरिकांना याची झळ बसताना दिसून येत आहे. त्यात वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिक हतबल आणि हताश झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात वाढत्या इंधनदवाढीच्या मुद्दयावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला जबाबदार ठरवत नवा जावई शोध लावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंधनदरवाढीला राज्यसरकारला जबाबदार आहे, असं विधान केलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाकाळात केलेल्या मदतीची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. १११ रुपये पेट्रोल, डिझेल झालं. यातून दुखी होणाऱ्या माणसाला मोदींनी काय दिलं, याची भली मोठी यादी आहे.

पाटील म्हणाले की, मोदींनी वॅक्सिंग फ्री दिलं, रेशन फ्री दिलं, निराधार महिलांच्या खात्यावर ५०० रुपये टाकले, १००० रुपये वृद्धांना दिले, अशी मोठी यादी आहे. त्यामुळे इंधनदरवाढीमुळे कोणी नाराज असतील, तर हे माहितीये की महाराष्ट्र सरकारमुळेच इंधनाचे दर जास्त झालेत. असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

 

Team Global News Marathi: