कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ खास पेय दिवसातून तीन वेळा प्या

 

सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेकांना कोरोनाची लागण होऊन आपला प्राणही गमवावा लागला आहे. आज वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण अपसरले आहे. याच अप्र्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला दूर ठेवण्यासाठी आज नागरिक विविध उपाययोजना करून कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करताना दिसत आहे.  कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देताना दिसत आहे.

मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार जास्त प्रमाणात घेतला जात आहे. यामुळे वजन देखील वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच वर्क-फ्रॉम-होममुळे अनेकांना घरीच बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या सुद्धा वाढताना दिसत आहे. पण आज आम्ही तुम्हाला असे एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल आणि तुमचे वजन देखील वाढणार नाही.

 हे खास पेय खरी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. चार तुळशीची पाने, चार पुदिन्याची पाने, हिंग, मध दोन चमचे, काळी मिरी चार, लवंग पाच, कढीपत्ताची चार पाने, गुळ चार चमचे आणि आद्रक हे तयार करण्यासाठी तीन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये सुरूवातीला तुळशीची, पुदिन्याची आणि कढीपत्ताची पाने मिक्स करा हे दहा मिनिटे चांगले उकळूद्या. त्यानंतर यामध्ये काळी मिरी, हिंग, लवंग आणि गुळ मिक्स करा. परत दहा मिनिटे उकळूद्या आणि शेवटी यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. हे पाणी आपण दिवसातून तीन वेळा पिले पाहिजे.

Team Global News Marathi: