कोरोना संसर्गाचा जन्म वुहान लॅबमध्येच, पुण्याच्या ‘या’ वैज्ञानिक जोडप्याचा दावा !

 

                 पुणे | सध्या संपूर्ण जागर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाचा जन्म नेमका कुठे झाला याबाबत अनेक देशातील वैज्ञानिक शोध लावत असताना चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून करोनाची उत्पत्ती झाल्याचा दावा अनेक वैज्ञानिकानी केला होता मात्र अद्याप तसे कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. दरम्यान चीनमध्ये २०१२ मध्ये घडलेला एका घटनेने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि यासाठी पुण्यातील एक दांपत्य कारणीभूत ठरलं आहे. या घटनेचा करोनाच्या उत्पत्तीशी संबंध जोडला जात असून इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी याचा शोध घेण्यामागची कारणं समोर आलं आहे. आहेत.

                पुण्यात राहणारं वैज्ञानिक दांपत्य डॉ. मोनाली राहलकर आणि डॉ. राहुल बाहुलीकर यांनी जगभरात लोकांना होणारी हेळसांड पाहता करोनाच्या उत्पन्नीचं कारण शोधण्यासाठी खोलपर्यंत जाण्याचे ठरविले होते असे त्यांनी सांगितले. “लोकांना होणारा त्रास पाहता नेमकी या व्हायरसची सुरुवात कशी झाली यासाठी आम्ही उत्सुक आणि चिंताग्रस्त होतो. आम्ही करोनाशी संलग्न असणाऱ्या इतर व्हायरसचा  शोध घेण्याची सुरुवात केली,” असं त्यांनी सांगितलं आहे.

              त्यात शोध सुरु असतानाच दक्षिण चीनमध्ये मोजियांग येथे वापरात नसलेल्या तांब्याच्या खाणीची काही कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, २०१२ मध्ये सहा कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी खाणीमध्ये अंडरग्राऊंड पाठवण्यात आलं होतं. या खाणीत मोठ्या प्रमाणात वटवाघुळांचा संचार होता.यानंतर हे सहा कर्मचारी गंभीर आजारी पडले होते. यावेळी करोना रुग्णांमध्ये दिसणारी ताप, खोकला, रक्ताच्या गुठल्या अशी लक्षणं त्यांच्यात दिसत होती. याशिवाय थकवा, फुफ्फुसातील न्यूमोनिया ही लक्षणंही जाणवत होती. डॉक्टर मोनाली यांनी काही कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या सहापैकी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

                डॉक्टर मोनाली यांच्या म्हणण्यानुसार, “वटवाघूळांचं मलमूत्र हे स्पर्श झाल्यास हवेत मिश्रित होतं. त्याच्यावर पाय पडल्यास ते आसापासच्या वातावरणात एकत्र होतं ज्यामुळे हवा अॅलर्जिक होते आणि तिथे उपस्थित असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.डॉक्टर मोनाली यांनी सांगितल्यानुसार, जगभरातील करोना रुग्णांचे रेडिओलॉजिकल रिपोर्ट पाहिले असता मोजियांगमधील खाण कामगारांशी अत्यंत मिळते जुळते असल्याचं लक्षात येतं. सीटी स्कॅनलमध्येही हा साधर्म्यपणा जाणवत आहे. “मे २०२० मध्ये आम्ही यासंबंधी पेपर प्रसिद्ध केला होता. यानंतर ‘TheSeeker’ या ट्विटर युजरने आमच्याशी संपर्क साधला. त्यानेही शोध घेतला असता याच गोष्टी समोर आल्या होता. मोजियांगच्या खाणीमधील कामगारांना जाणवणाऱ्या लक्षणांची माहिती असणारा प्रबंध त्याने आमच्यासोबत शेअर केला,” अशी माहिती डॉक्टर मोनाली यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: