‘गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत’ पुन्हा राऊतांनी राणेंवर साधला निशाणा

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखल देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. “टीकांना आम्ही घाबरत नाही. शिवसेना पक्ष टीकांचं स्वागतच करतो. टीका बाळासाहेबांवरही व्हायची. पण आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

राऊत आता मुंबई विमानतळावर मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना बोलत होते. “टीकेला कोण विरोध करतंय? टीका करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. पण टीका करणं आणि बेताल बरळणं यात फरक आहे. सध्या जे चाललं आहे त्याला टीका म्हणत नाही. गटारात तोंड बुडवून थुंकण्याला टीका म्हणत नाहीत. असं करणाऱ्यांनी तोंड गटारात बुडतंय हे आधी लक्षात घ्यावं असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. “तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचं काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणी तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे हे आधी लक्षात घ्या”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. आता या टीकेला भाजपा काय उत्तर देतेत हे पाहावे लागणार आहे,

Team Global News Marathi: