डॉ. हीना गावीतांना इतर समाज मत देण्यास तयार नव्हता; एकनाथ खडसे याचा गौप्यस्फोट

डॉ. हीना गावीतांना इतर समाज मत देण्यास तयार नव्हता; एकनाथ खडसे याचा गौप्यस्फोट

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघ निवडण्यात माझा मोलाचा वाटा आहे. खा. डॉ हिना गावित यांना इतर समाज मतदान करण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळी मी प्रकाशा येथे मेळावा घेऊन भारतीय जनता पार्टीला विजयी करा असे आवाहन मी केले होते तेव्हा नंदुरबार मध्ये पहिल्यांदा कमळ फुलले असा गौप्यस्फोट आज एकनाथ खडसे यांनी शहादा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

डॉ विजयकुमार गावित व खासदार हिना गावित यांना भाजपात मीच आणले. जनता ही प्रेमळ असते ,त्यांना समजून सांगितल्यास ती ऐकते , प्रकाशा येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ते , बूथ प्रमुख , पदाधिकारी यांची यावेळी समजूत काढली व हिना गावित यांना मतदान करण्याचे आवाहन केले तेव्हा हिना गावित या विजयी झाल्या असा दावा राष्ट्रवादी चे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. या प्रसंगी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख , जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे उपस्थित होते .

ग्लोबल न्युज नेटवर्क: