“तुरुंगात जाऊ नये म्हणून अनेक लोकांच्या तब्येती बिघडतात आणि हॉस्पिटलमध्ये जातात”

 

शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडी संपल्याने शुक्रवारी त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर नितेश राणे यांनना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मात्र या प्रक्रियेदरम्यान आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजप आमदार नितेश राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरुन आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, तुरुंगात जाऊ नये म्हणून अनेक लोकांच्या तब्येती बिघडतात आणि मग ते तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये जातात.ज्यावेळेला मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा हे कधीही सहन केलं नव्हतं. मी ताबोडतोब युनिट पाठवून चेकिंग केलं. अनेकवेळा डॉक्टर, अधिकारी सगळे दबावाखाली येतात.आणि नंतर मग असे प्रकार घडतात.

ते पुढे म्हणाले की, मी गृहराज्यमंत्री असताना या खात्याचा अनुभव घेतलाय आणि मला असं आढळून आलं की अनेक लोक हे आजाराचं निमित्त करतात आणि पोलीस कस्टडी किंवा जेलमध्ये जाण्यापासून दूर राहतात असे नाव न घेता केद्रंरकर यांनी आमदार नितेश राणे यांना टोला हाणला आहे.

Team Global News Marathi: