काही तरी असेल म्हणून घाबरता ना ?;, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

काही तरी असेल म्हणून घाबरता ना ?;, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटिस धाडण्यात आलेली आहे. तसेच वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी (दि. २८ डिसेंबर) सोमवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता.

आता राऊतांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केलेल्या टिकेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे. ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे, त्याला भाजपशी जोडणं असमंजसपणाचे आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. संजय राऊत किंवा विरोधकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना मान्य नाही. त्यामुळेच ते बहुदा काहीही घडले की त्यावरून टीका करतात, असा टोलाही पाटील यांनी मारला.

‘मध्यंतरी राऊत यांनी शंभर जणांची यादी देतो, त्यांना ईडीची चौकशी लावा असे म्हटले होते. त्यांनी शंभरच काय तर दोनशे जणांची यादी द्यावी, कारवाईसाठी पाठपुरावा करावा. आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काहीही झालं तरी भाजपच्या नावानं ओरडता कशाला, काही नसेल तर घाबरता का? काहीतरी असेल म्हणून घाबरता ना?’, असा चिमटा पाटील यांनी काढला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: