बदनामीला घाबरू नकोस.’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा भास्कर जाधव यांना सल्ला !

 

अतिवृष्टी झालेल्या रत्नागिरीमधील चिपळूण दौऱ्याची पाहणी करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर एका महिलेला अरेरावी केल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. विरोधकांनीही या प्रकरणावरून भास्कर जाधवांवर टीका केली. यावरून मुख्यमंत्री भास्कर जाधवांना काय बोलले याबाबत भास्कर जाधवांनी माहिती दिली आहे.

रविवारी झालेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मला मुंबईला जाईपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस. आपल्यामधील शिवसैनिक जागा ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला जा, असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री व्यापारांशी बोलत होते त्यावेळी एक महिला आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं. त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्यांना धीर देत होते मात्र त्यावेळी भास्कर जाधव आले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठंय अरे आईला समजव आईला समजव उद्या ये असं बोलले.

Team Global News Marathi: