दोन झारीतल्या शुक्राचार्यांमुळे ओबीसी आरक्षण मिळत नव्हत – चंद्रशेखर बावनकुळे

 

छगन भुजबळ हे ओबीसींसाठी काम करत होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन सदस्य झारीतल्या शुक्राचार्य याची ओबीसी आरक्षणा ची इच्छा नव्हती. ओबीसी आरक्षणासाठी खोडा घालणारे हे दोन्ही नेते असल्याची खळबळजनक टीका भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे.

भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर असून आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाचा प्रवासच मांडला. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी लढा दिला मात्र खऱ्या अर्थाने भाजपने ओबीसी आरक्षण पूर्णत्वास नेले. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीचे नेते आम्हीच ओबीसी नेते असल्याचं सांगत आहेत. मात्र ओबीसींसाठी सत्तेत असताना काही केले नाही. 2016 मध्ये भाजप सरकार होते, तेव्हा काँग्रेसने ओबीसी आरक्षणात आडकाठी आणत न्यालायात याचिका दाखल केली. त्यावेळी ओबीसीना 27 टक्के आरक्षण कसे योग्य आहे हे कोर्टाला पटवून सांगावे ही फडणवीस यांची इच्छा होती. 2018 ला पुन्हा काँग्रेस न्यालायात गेले. तेव्हा आम्ही पुन्हा 27 टक्के आरक्षण योग्य कसे हे पटवून सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्व निवडणूक सुरू झाल्या. ओबीसी आरक्षण मिळाले.

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाविकास आघाडी काही गडबड करतील असे वाटत होते, तेव्हा भुजबळ, आणि इतर नेत्यांना भेटलो. ओबीसी आरक्षण अध्यादेश लाप्स होईल हे सांगितले. मात्र ऐकले नाही, तुमच सरकार गेले तुम्ही जा असे सांगीतले. त्यानंतर कोर्टाने ट्रिपल टेस्ट मागितली. त्यानंतर भुजबळ, वडेट्टीवार हे नेते मोर्चे आंदोलन करत राहिले. न्यायालयाने 4 मार्चला ओबीसी आरक्षण रद्द केले. 5 मार्च ला फडणवीस यांनी पुन्हा भूमिका मांडली.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती ‘सामना’नं नाकारल्या; शिंदे गटाचा दावा

ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्रं, पळ म्हटलं की पळतो

Team Global News Marathi: