‘डॉक्टर xxxxखोर आहेत, ते मारायच्या लायकीचे’ संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

 

सांगली | सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक विधान केलं आहे. ‘ जेवढा शिकलेला माणूस तेवढा गाढव आहे. डॉक्टर लोक हे नालायक आहेत, ते लुटारू आहेत. ते xxxxखोर आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे आहे, असं वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी भिडे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजी भिडे यांनी यावेळी डॉक्टरांवर राग व्यक्त केला. ‘कोरोनाच्या काळात लोक ही भीतीमुळे मेली. जी वाचली ती जगण्याची लायकीची नाही. माणूस जेवढा शिकला तेव्हा तो गाढव. डॉक्टर हे नालायक आहेत, ते रुग्णांना लुटतात. ते …..खोर आहेत, हे डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहे. त्यांच्याकडे कधी जाऊ नका, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

या सभेत एक जण मास्क घालून बसला होता, त्या पाहून संभाजी भिडे यांनी मास्क काढण्यास त्याला सांगितले. तू मराठी माणूस आहे, काय XXडू नाही. या कोरोना हे थोतांड आहे. डॉक्टर हे नालायक आहे. कोरोनाच्या काळात या डॉक्टरांनी लोकांना लुटलं आहे, लोकांना खाल्लं त्यामुळे डॉक्टरांकडे कधी जाऊ नका, असा सल्लाच भिडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

Team Global News Marathi: