ज्ञानदेव वानखेडे यांचा मलिकांविरोधात सव्वा कोटींचा मानहानीचा दावा !

 

मुंबई | राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. त्यातच मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप करत बदनामी केली होती या विरोधात आता वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचे दार ठोकावले आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांचा नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला होता. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारपासून सुरूवात होणार आहे.

आज सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत या प्रकरणाबाबत हल्ली रोज माध्यमांत नव नवे आरोप प्रत्यारोप होत आहेत, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच आम्हाला अद्याप नोटीस मिळालेली नाही, अशी नवाब मलिकांच्यावतीने हायकोर्टात माहिती देण्यात आली. हे प्रकरण सुनावणीला येईपर्यंत नवाब मलिकांना वानखेडे कुटुंबियांबाबत कोणतीही विधान करण्यापासून मनाई करावी हीदेखील याचिकेतील ज्ञानदेव वानखेडेंची मागणी आहे.

या प्रकरणात मंगळवारपर्यंत नवाब मलिकांना वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आता बुधवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तूर्तास नवाब मलिकांना हायकोर्टाकडनं कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत. नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र शेअर केले होते.

तसेच समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे आणि दुसऱ्या लग्नाचे फोटोही शेअर केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राचा वापर करून आयआरएची नोकरी मिळवली. जातीच्या आधारावर ही नोकरी मिळवल्याने दुसऱ्या मागासवर्गीय उमेदवाराची संधी हिरावली गेल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

तसेच समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मीय असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर वानखेडे कुटूंबीयांनी मात्र स्पष्टीकरण देताना आम्ही हिंदू असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही आपले लग्न हे हिंदू धार्मिक विधीने झाले असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आम्ही हिंदूच असल्याचा खुलासाही क्रांती रेडकर यांनी केला होता.

Team Global News Marathi: