नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरून शिवसेना – भाजपमध्ये होणार वाद !

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे पुन्हा एकदा शिवाजी पार्क परिसरात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पाहायला मिळणार आहे. राणे यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दुसरीकडे राणे यांना शिवसैनिक स्मृतिस्थळावर येऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे वादाची स्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार व शुक्रवार जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. यावर शिवसेनेने हरकत घेत जोरदार विरोध केला आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा नेत्याला स्मृतिस्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत, असे राऊत म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवाजी पार्कात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना एकमेकांविरुद्ध भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Team Global News Marathi: