दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना आघाडी सरकारचा मोठा झटका

 

मुंबई | मुंबई | दिशा सालियानने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली. तिच्यावर बलात्कार झाला असून ती गरोदर होती, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. राणेंच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकारण रंगत असताना राणे पिता पुत्रांना मोठा झटका मिळाला आहे.

नारायण राणे व नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानची बदनामी आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी सालियान कुटुंबीयांनी राणे पिता पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या तक्रारीमुळे आता राणे पिता-पुत्राच्या अडचणीत वाढहोणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, नारायण राणे व नितेश राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल अनेक खुलासे केले. यानंतर आमच्या मुलीची बदनामी थांबवा, असं आवाहन दिशाच्या आई-वडिलांनी केलं होतं. अखेर सालियान कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: