डिसले गुरुजींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

 

आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज ग्लोबल टीचर्स अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसले गुरुजींच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चुकीचे काम होऊ नये याबाबत सर्व आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं.

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसलेहे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची माहिती खोटी निघाल्यानंतर आता त्यांच्यावर केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं आहे.

समितीचा निष्कर्ष आहे की, प्रभारी मुख्याध्यापक कदम यांनी सांगितलं की, शालार्थ वेतन प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड डिसले यांच्याकडे होता. त्यावरुन डिसले यांनी स्वत:चा पगार परस्पर काढून घेतला असं मुख्याध्यापक कदम यांनी सांगितल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. मात्र खुद्द कदम यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाश्याचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्यात कदम यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या आदेशात उल्लेखित केल्याप्रमाणे त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन करण्याचे आदेश होते. त्यानुसार त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन गटशिक्षणाधिकारी यांनी अदा केले आहे, असे या खुलाश्यात म्हटले आहे.

Team Global News Marathi: