दिघे साहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही

 

ठाणे | शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.
शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावलं आहे.

जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले की, जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष असला तरी तो सोपा असतो. मला लहान वयात जिल्हाप्रमुख पद मिळालं आहे. माझ्यासारख्या तरूणाला हे पद मिळाल ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आहे.

तसेच शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही. बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच माझ्यावर दिघेसाहेबांचे संस्कार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहणं हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायचं आहे. दिघे साहेबांनी घडवलेल्या शिवसेनेत इतकं मोठं पद मिळणं माझ्यासाठी भाग्याचं होतं. मी खूप भावनिक आहे. आत्ता जी परिस्थिती आहे ती संघर्षाची आहे. त्यातून मी संघटना पुढे जाऊन जाणार आहे असंही जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी सांगितले.

Team Global News Marathi: