दिया मिर्झाच्या माजी मॅनेजरला ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून अटक

अभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून अनेक कलाकारांची ड्रग्स प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या संबंधित व्यक्तींची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. आता सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिच्या मॅनेजरला एनसीबीने अटक केली आहे. राहिला आणि करण शाळांनी असे अटक करण्यात आलेल्या मॅनेजरची नावे आहे.

काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानीजवळून तब्बल २०० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर यांना ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अखेर अटक करण्यात आली.

 

यापूर्वी एनसीबीने सुशांत सिंह राजपूतच्या जवळचा असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला अटक केली होती. ऋषिकेश सुशांतच्या ड्रीम टीम प्रोजेक्टचा मॅनेजर होता. त्याने २०१८-१९ मध्ये सुशांतसोबत काम केलं. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

Team Global News Marathi: