धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ असलेल्या जामदा गावात कीर्तन सुरु प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प ताजुद्दीन महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कीर्तन सुरु झाल्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना अवघ्या 45 मिनिटात त्रास जाणवू लागला. यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
कीर्तनकार ताजुद्दीन महाराज हे जन्माने जरी मुस्लीम असले तरी त्यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती.
ह.भ.प. ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन करायचे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वारीला हजेरी लावली आहे. त्यांच्या मृत्यूने धुळे जिल्हा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपणास कळविण्यात अतिशय दु:ख होते की वारकरी सांप्रदायातील एक क्रांतिकारी कीर्तनकार *श्री ह भ प ताजोद्दीन बाबा औरंगाबाद* यांना काल रात्री नंदुरबार मधे चालू कीर्तनात हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेर चा श्वास घेतला. अवघे ४५ मिनिट किर्तन केले आणि चालू कीर्तनात सर्व घडले.
असे भाग्य फार थोड्यांच्या नशिबी येते आणि याचाच अर्थ त्यांची आजवरची सेवा भगवंत चरणी रुजू झाली असे सांप्रदायात मानण्यात येते.
महाराजांचे कार्य खुप मोठे आहे.धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने कार्य केले.अशा महान व्यक्तिमत्त्वाला ईश्वर चरणी जागा मिळो. वै श्री ह भ प ताजोद्दीन बाबांना भावपूर्ण आदरांजली.
राजाभाऊ चोपदार.. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वंशपरंपरागत चोपदार
वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र.