धवलसिंह मोहिते-पाटील काँग्रेस प्रवेश : ज्या रामाने बिबट्याची शिकार केली त्याच प्रमाणे भाजपाची शिकार करतील – धीरज देशमुख

धवलसिंह मोहिते-पाटील काँग्रेस प्रवेश : ज्या रामाने बिबट्याची शिकार केली त्याच प्रमाणे भाजपाची शिकार करतील – धीरज देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश टिळक भवन, मुंबई येथे पार पडला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला आहे. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे

दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांना वडील आणि माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आठवण आली. काँग्रेसचे विचार कधी संपणार नाही, असे विलासराव नेहमी म्हणत होते. भलेभले संपणार पण कॉंग्रेस संपणार नाही, असे विलासराव देशमुख नेहमी सांगायचे.

धवलसिंह मोहित पाटील यांच्याकडून कॉंग्रेसला बळ मिळणार आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केळी, त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: