देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र कळलाच नाही; वाचा सविस्तर-

देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र कळलाच नाही; वाचा सविस्तर-

 

महाराष्ट्रात ऑगस्ट 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा भागात महापूर आला होता. आज ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान राजकीय सभा घेत फिरत आहेत त्याच पद्धतीने त्यावेळी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे महाराष्ट्र विरोधी नेते देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचारात “महाजनादेश” यात्रा करत फिरत होते.

त्यावेळी, भाजच्या गिरीश महाजन सारख्या मंत्र्यानी महारापुरात सेल्फी काढत आणि मदतीचे नाटक करत आणि महापूर पर्यटन करत लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. मदतीच्या पाकिटांवर भाजपच्या जाहिरातबाज नेत्यांनी स्वतःचे स्टिकर छापून अन्न धान्य आणि सामुग्री वाटप करताना निर्लज्ज पनाचा कळस केला होता.

पुरात बुडालेल्या लोकांना तात्काळ मदत जाहीर करण्याऐवजी वेगवेगळ्या निकषांमध्ये लोकांना अडकवून तत्कालीन फडणवीस सरकारने लोकांना अक्षरशः मरणाच्या दारात सोडून दिले होते. स्वतः फडणवीस निवडणूक प्रचारातून वेळ काढून महापुरात अडकलेल्या लोकांचे अश्रू पुसायला आलेच नाहीत कारण निवडणुका जिंकणे हीच त्यांची प्राथमिकता होती.

दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधात असूनही पूर्ण ताकतीने महापुराच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी उतरले होते. सत्ताधारी फडणवीसांवर आरोप करण्यात वेळ न घालवता लोकांना वाचवणे, मदत पोहचवणे आणि संकटातून बाहेर काढणे याला तत्कालीन सर्वच विरोधी नेत्यांनी महत्व दिले. राजकारण केव्हाही करता येईल परंतु लोकांचे जीव वाचवने महत्वाचे याला तत्कालीन विरोधकांनी महत्व दिले.

स्वतः जेष्ठ नेते पवारसाहेब महापूर आलेल्या भागात गेले, वेगवेगळ्या तालुक्यात आणि जिल्ह्यातील भागात जाऊन लोकांना धीर दिला, मदत पोहचवली, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं होतं तिथे स्वतः चिखलातून जाऊन भेटी दिल्या. बारामतीत एका तासात पवारसाहेबांनी कोट्यावधी रुपयांची मदत पुरग्रस्थ लोकांसाठी गोळा केली होती, त्या मिटिंगचा मी स्वतः साक्षीदार आहे. एवढ्यावर न थांबता तत्कालीन राज्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत सूचना देखील केल्या.

दुसरीकडे काँग्रेस मधील विश्वजित कदम असोत नाहीतर सतेज पाटील किंवा राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ किंवा जयंत पाटील असोत, अपक्ष यद्रावकर पाटील असोत नाहीतर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, हे सगळेच नेते महापुराच्या पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धडपडत होते. विश्वजित कदमांच्या पायाला त्याच काळात मोठी जखम झाली होती तरीही त्याची पर्वा न करता न थकता लोकांसाठी ही जनमानसातली ही नेते मंडळी कंबर कसून उभी ठाकली होती.

फक्त पुरुष मंडळीच नव्हे तर महिला असूनही स्वतः सौभाग्यवती शैलजाताई जयंत पाटील यांनी सुद्धा पूर आल्याच्या पहिल्या दिवसांपासून लाखो लोकांना जेवण पुरवण्यासाठी कार्यकर्त्यानासह जिद्दीने काम केले. जो पर्यंत संपुर्ण पूर परिस्थिती पूर्ववत झाली नाही तोपर्यंत जयंत पाटलांच्या घरून कित्येक लाख लोकांचं जेवण दिलं गेलं होतं. (हे मुद्दामहून इथे नमूद करतोय कारण सध्या अमृता फडणवीस हे याच्या अगदी उलट उदाहरण आपल्या समोर आहेच)

जिल्ह्याच्या बाहेरूनही बारामतीतून अजितदादा असतील, शिरूरहुन अशोक बापू, वळसे पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, बाळासाहेब थोरात, भुजबळ साहेब किंवा इतरही भागातील सर्वच नेत्यांनी राजकारण विसरून कित्येक ट्रक भरून कोट्यवधी रुपयांचे साहित्य, अन्न धान्य, कपडे, औषधे आणि इतरही मदत पाठवली होतं. याच एकमेव कारण आपलं राज्य अडचणीत असतांना राजकिय मतभेद विसरून काम करायचं असतं ही इथल्या मातीची संस्कृती आहे.

हा सगळा इतिहास इथे सांगण्याचं कारण म्हणजे ज्या ज्या वेळी महाराष्ट्र अडचणीत आला त्या त्या वेळी इथल्या राज्यकर्त्यांनी राजकीय विरोध बाजूला सारत हातात हात घालून काम केलेले आहे. संकट कोणतेही असो आणि कितीही मोठं परंतु त्यात राजकारण न करता जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचा, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला “फडनवीशी” ग्रहण लागल्या सारखं झालं आहे. राज्य अडचणीत असतांना सुद्धा “पुन्हा सत्ता मिळाली नाही” हे शल्य मनात ठेवून उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी नवीन कपटी राजकीय डावपेच खेळून महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचे हे कपटी फडनवीशी खेळ गेले वर्षभर महाराष्ट्र अनुभवतोय. कोरोना सारख्या संकटात ज्या मुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसानही झालेले आहे.

2014 ते 2019 या काळात महाराष्ट्रात अमर्याद सत्ता अलगदपणे आणि आयती हाती मिळाल्याने अहंकारी आणि गर्विष्ठ बनलेल्या फडणवीसांना अजूनही त्याच्या हातातून गेलेली सत्ता पचनी पडलेली नाही. सत्तेच्या वर्तुळात असतांना स्वकीयांची जिरवा जिरवी करणे, चौकश्या लावणे, भ्रष्टाचाऱ्यांना क्लिन चिट वाटत फिरणे यासाठी सत्तेचा वापर झाला. यातूनच महाराष्ट्राची संकटकाळी एकत्र येऊन काम करण्याची जी गौरवशाली परंपरा होती त्याचा सुद्धा विसर फडणवीसांना पडला असावा.

आज महाराष्ट्र कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात असतांना खरंतर केंद्राकडून महाराष्ट्राला भरीव मदत मिळवून देण्यासाठी जर फडणवीसांनी त्यांचे वजन वापरले असते तर मागील काळात त्यांची अहंकारी आणि सत्तापिपासू म्हणून तयार झालेली छबी बदलण्यात नक्कीच मदत झाली असती आणि लोकांच्या मनात पुन्हा स्थान निर्माण करण्यात ते कदाचित यशस्वी झाले असते. अडचणी असलेल्या राज्याला पुन्हा उभा करण्यासाठी त्यांनाही योगदान देता आले असते.

परंतु सतत नकारात्मक पद्धतीने राजकारण करणाऱ्या आणि फक्त जाहिरातबाजी, मांडलिक असलेले पत्रकार अथवा सोशल मीडियाच्या वापरातून स्वतःची इमेज बनवू पाहणाऱ्या फडणवीसांनी अशी कुठलीही गोष्ट केली नाही की ज्या मुळे अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्राला मदत होईल. अडचणीत असलेल्या महाराष्ट्रात आधार मिळवून देण्याचा कोणताही प्रयत्न फडणवीसांनी केला नाही.

GST परतावा असो, औषधे किंवा PPE किट असो किंवा मास्क असो, याचा योग्य पुरवठा महाराष्ट्राला व्हावा म्हणून एकदाही पंतप्रधानांची भेट फडणवीसांना घ्यावी वाटली नाही. देशात सर्वात जास्त कोरोनाचे संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला मदत करायचे सोडून केंद्राला (PM केअर फंडाला) सगळी मदत पाठवणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माती केली. आता सुद्धा लसी असोत नाहीतर रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा याबाबतीत सुद्धा नीच राजकारण करण्यात फडणवीसांनी बाजी मारली.

दुसरीकडे राज्यात रोज उठून राज्यपालांना दिले जाणारी निवेदने आणि आरोप नित्याच्या झालेल्या आहेत. कंगना सारख्या मोहऱ्यांचा वापर महाराष्ट्राच्या बदनामीसाठी केला गेला. प्रशासकीय यंत्रणेतील स्वतःच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संकटकाळी यंत्रणा कोलमडून पडली पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु या सगळ्या मध्ये जीव मात्र सामान्य मराठी माणसाचे जाणार आहेत हे फडणवीस विसरले.

एव्हडे कमी की काय म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल अपशब्द वापराने, रेमडीसीवरची साठेबाजी करणाऱ्या लोकांसाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा करणे, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना सारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालणे, सतत वेगवेगळ्या प्रकारे सरकारला अडचणी निर्माण करणे अश्या कित्येक नकारात्मक बाबतीत फडणवीस आघाडीवर आहेत.

महाराष्ट्राची मोठी राजकीय परंपरा फडणवीसांनी केव्हाही समजून घेतलीच नाही. इथे राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नव्हे हे समजून घेण्यात नक्कीच ते कमी पडले. विरोधकांना हरवण्यासाठी जनतेचा बळी देण्याची सुद्धा त्यांची तयारी असावी अशीच त्यांची एकूण राजकीय वागणूक महाराष्ट्राला आजपर्यंत दिसून आली. सतत सत्तेसाठी सुरू असलेला त्यांचा आटापिटा हा रोज जनतेसमोर नागडा होऊन दिसत असतो. परंतु सगळं समजूनही प्रत्येक उगवत्या दिवसागणिक त्यांचं आणखी नागडेपन ते इथल्या लोकांना दाखवतात.

भविष्यात ते सत्तेत येवू शकतील का ? तर माहीत नाही. परंतु आज महाराष्ट्र अडचणीत असतांना भाजप मधील जे नेते होते ज्यांनी महाराष्ट्रात भाजपला वाढवलं मोठं केलं त्या स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, स्व.पांडुरंग फुंडकर, बाळासाहेब भारदे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे किंवा अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा यांची नक्कीच आठवण आल्या शिवाय राहत नाही. ही मंडळी कायम महाराष्ट्राच्या पाठीशी उभी राहिली, जरी ते सत्तेत नसतील तरी महाराष्ट्र हिताला त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणूनच आजही स्व. मुंडे असतील, महाजन असतील किंवा गडकरी असतील यांच्या बाबतीत नक्कीच सर्व पक्षीय नेत्यांच्या आणि जनतेच्या मनात आजची आदराची भावना आहे.

दुसरीकडे फडणवीस अजूनही महाराष्ट्राला समजू शकले नाहीत हेच खरं. कोरोना संकटात राजकिय मतभेद बाजूला सारून पुढे येऊन त्यांनी महाराष्ट्राला (सरकार म्हणून नाही केली तरी चालेल) मदत केली तर नक्कीच त्यांचं सुद्धा नाव या राज्यात राहील. अन्यथा सत्तेसाठी कितीही धडपड केली तरी इथली जनता त्यांना परत महाराष्ट्रात कधीही “मी पुन्हा येईन” हे म्हणण्याची संधी देणार नाही, कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जिथे शत्रूच्या सुनेचा सुद्धा आई म्हणून आदर केला जातो.

जय महाराष्ट्र 🙏
काळजी घ्या, नियम पाळा, कोरोना टाळा 👍

फेसबुकवरून साभार

ग्लोबल न्युज नेटवर्क: