देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्या व्यक्तीला अटक

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावणाऱ्या आणि अपशब्द वक्तव्य करणाऱ्या इसमाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या या इसमाने व्हिडिओच्या माद्यमातून केला होता. या व्हिडिओनंतर एकचं खळबळ उडाली होती.

फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता.मात्र दाखले यांच्या आरोपानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा वातावरण पसरले होते.

संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे फडणवीस यांची बदनामी होत असल्याचं लक्षात येताच भाजपा कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी दाखले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Team Global News Marathi: