देवेंद्र फडणवीस पीएम होतील असं वाटत का ? अमृता फडणवीस म्हणतात

 

झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. पहिल्यांदा या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. यानंतर आता या प्रोग्राममध्ये अमृता फडणवीस यांनी हजेरी लावल्याचे समजते. अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारल्या. याचवेळी त्यांना देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील असं तुम्हाला वाटत का ? असा सवाल विचारण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्तांतर झालं. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकारणाबाबत बस बाई बस मध्ये दिलखुलासपणे गप्पा मारल्याचे पाहायला मिळतंय. फडणवीसांच्या पंतप्रधानपदाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या,”माहिती नाही. ते मुख्यमंत्री होतील, हेच मला कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान तर वाटूच शकत नाही”.

पंतप्रधान पद हे असे आहे की त्यावेळी देशाच्या हितासाठी काय चांगलं आहे हे लक्षात ठेवून करावं. आता सध्या नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही देशासाठी चांगले नाही हे मला समजतंय. पुढे १० ते २० वर्षे गेल्यानंतर तेव्हा त्या पदासाठी कोण पात्र असेल हे मी आताच सांगू शकत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होतील की नाही हे मला माहिती नाही”, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

Team Global News Marathi: