‘देवेंद्र सरकारमध्ये सहभागी होणार हे माहिती नव्हतं; हा धक्का..’,

 

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि महाविकास आघाडीतील अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

त्यानंतर दोनच दिवसात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील या राजकीय नाट्यात देवेंद्र फडणवीसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अनेक खुलासे केले आहे

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नाट्यमय बदलामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सरकार बदलणं ही माझ्यासाठीही आश्चर्याची बाब होती, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी मी देशात नव्हते. मी लंडनमध्ये होते, असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या नाराज गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि आणि भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केलं.

मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. अमृता म्हणाल्या, ‘मला वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस सरकारचा भाग होणार नाहीत, पण त्यांनी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं.’ अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य होतं.शपथविधीच्या दिवशी माझी मुलगी दिविजा घरीच होती. देवेंद्रने तिला काहीच न बोलता तिकडे नेलं. राजभवनात पोहोचल्यावर तिला कळालं की तिचे वडील आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत.

Team Global News Marathi: