इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपचे डोके ठिकाणावर आलें नाही – काँग्रेस

 

मुंबई | भारतीय जनता पक्षातर्फे काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर जमवण्यात आलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांवर विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत. जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलें नाही. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.

 

सचिन सावंत म्हणाले की, जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलें नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत अशी खमखमीत टीका सावंत यांनी केली आहे.

कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिला आहे. सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये! असेही ते म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: