देश विकणाऱ्या भाजपला राहुल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही

 

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांच्या टी-शर्टवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. यावर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपद, मंत्रीमंडळ विस्तार, अमोल मिटकरी यांच्यासह महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत निशाणा साधला आहे.

नाना पटोले भाजपवर निशाणा साधत म्हणाले, राहुल गांधींच्या टी-शर्टपेक्षा भाजपनं महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. सत्तेमध्ये येतांना दिलेली वचनं न पाळता शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केंद्र सरकार करतंय. मुठभर मित्रांना फायदा देण्यासाठी केंद्राचं काम आहे. देश विकणाऱ्यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही. केंद्रानं तपासयंत्रणाचं दुरूपयोग केला आहे. भाजप सत्तापिपासू असल्याचं लोकांच्या लक्षात येतं आहे.

राहुल गांधींनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं ही काँग्रेसजनांची ईच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य फक्त गांधी परिवारातच आपल्याला अध्यक्षपदाची ऑफर असल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी स्पष्टोक्ती दिली आहे.

Team Global News Marathi: