उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वतःच्या मुलाचीच चिंता; भाजप आमदाराची टीका |

 

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच यावेळी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. त्यांना स्वप्निलशी काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का? याची चिंता त्यांना सतावत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला. स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली.

Team Global News Marathi: