“लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पाहिल्यांदाच पाहिला”

 

राज्यातील विधान भवनात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे तसेच कोरोजना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणारे अधिवेशन मुंबईत होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून टीकास्त्र सोडले जात आहे.

अशातच आता त्यांच्या अनुपस्थिवरुन भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेतण्याचा प्रयत्न करणार आहेत. यातच मुख्यमंत्र्याची अनुपस्थिती म्हणजे विरोधकांनी तर त्यांच्यावर आरोपांची मालिकांच लावली आहे. आता सुधीर मुनगंटीवर यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते पण ते आले नाही. अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरच्या गाडीचा शोध लागला, पण लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पाहिल्यांदाच पाहिला, असं खोचक टोला मुगंटीवर यांनी लगावला आहे. तसेच यापूर्वी भाजपच्या अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आघाडीवर सडकून टीका केली आहे.

Team Global News Marathi: