देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू !

 

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत असून याकडे सऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 14 टेबलवर ही मोजणी 30 फेऱ्यांची होणार आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुख्य लढत जितेश अंतापूरकर आणि सुभाष साबणे यांच्यात होत आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. या निवडणुकीत ६४ % इतकं मतदान झालं होतं. एकूण २ लाख ९८ हजार ५३५ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ८०० इतकं मतदान झालं.

एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून आहे. सुभाष साबणे यांचा अल्प परिचय सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली.

Team Global News Marathi: