कोल्हापूरमधील भाजपचा पराभव महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा संदेश : शरद पवार

‘ योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल’, शरद पवारांचा थेट भाजपला इशारा

कोल्हापूरमधील भाजपचा पराभव महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा संदेश : शरद पवार

कोल्हापुर : ‘केंद्र सरकारला असं वाटत असेल ईडी (ED), सीबीआय (cbi), इन्कम टॅक्सद्वारे छापे टाकून तोंड बंद करण्याची खात्री वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात राहत आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता डगमगणारा नाही, योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असा कडक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी भाजपला दिला.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार भाषणं करत भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी शऱद पवार यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपला उत्तर दिले आहे.

अलीकडच्या काळात अनेक प्रकार सुरू झाले. सत्ता येते आणि सत्ता जाते सुद्धा. पण सत्ता हाती आल्यावर पाय जमीनवर टेकवायचे असते. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. पण, आज काय होतंय, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. लोकप्रतिनिधी सन्माने काम करत असताना त्यावर दबाव आणला जातोय. आज अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकलं. अनिल देशमुख यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आणि आता आरोपपत्रात आरोप ४ कोटींचा केला आहे. आता हेच प्रकरण १ कोटी ४ लाखांचे आहे.  काही कारण नसताना एखाद अधिकारी चुकीचा वागत आहे, त्याच्याबद्दल भूमिका घेतली जात नाही. पण अनिल देशमुखांना तुरुंगात टाकले जात आहे.

नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले. २० वर्षांपूर्वी एक जागा घेतली. तोपर्यंत मध्ये काही दिसलं नाही. आता तिथे दुकानं सुरू आहे. यात त्यांचे नाव टाकले गेले. जर केंद्र सरकारला असं वाटत असेल ईडी,सीबीआय, इन्कम टॅक्सद्वारे छापे टाकून तोंड बंद करण्याची खात्री वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात राहत आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता डगमगणारा नाही, योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असं म्हणत पवारांनी भाजपला इशारा दिला.

एका कलाकारच्या मुलाला अटक केली. त्याच्याकडे काही सापडल्याचा दावा केला गेला. १८-१९ वर्षांच्या मुलाकडे जेलमध्ये टाकलं होतं. त्यानंतर चौकशी केली असता त्याकडे कोणताही अंमली पदार्थ नव्हते असं सांगितलं गेलं. आज त्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे सत्ता वापरली जात आहे,जर सत्ताधारी लोक असे वागत असली तर देशातील लोकांनी विचार करणे गरजेचं आहे, असंही पवार म्हणाले.

‘एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. हा देश एकसंध ठेवण्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट घेतले गेले. देशाची प्रगती कशी होईल, यासाठी प्रयत्न केले गेले. २०१४ ची निवडणूक वेगळी झाली. सत्ता भाजपच्या हातात गेली. लोकांचा कौल स्विकारला. पण, आपण पाहतो सत्ता हातात आल्यावर संयमाने वागलं पाहिजे, लोक एका विचाराने राहतील कसे, याचा विचार नेतृत्वानी केला पाहिजे. पण आज लोकांमध्ये अंतर वेगळे केले जात आहे.  दिल्लीत आज संघर्ष होत आहे, जाळपोळ झाली, वेगवेगळ्या घटना घडत आहे. केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे. पण गृहखाते त्यांच्या हातात नाही. गृहखात्यांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी दिल्लीची खबरदारी घेतली पाहिजे. दिल्लीत काही घडलं त्याचा संदेश जगभरात जातोय, अशी टीका पवारांनी केली.

‘एक कुणी तरी सिनेमा काढला. काश्मीरमध्ये पंडितावर कसे हल्ले केले हे दाखवण्यात आले. काश्मीरमधील पंडित भारतात इतर ठिकाणी गेले असं दाखवण्यात आलं. यातून जातीय वाद निर्माण केला आणि त्यातून मतांचा जोगवा मागण्याचे काम केले गेले. हे काम भाजपकडून झाले आहे. काश्मिरमध्ये ती स्थितीत होती, देशाची सत्ता विश्वासराव प्रताप सिंग यांच्या हातात होती आणि या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. केंद्रामध्ये गृहमंत्री हा भाजपच्या पाठिंब्यावर होता. असं असतानाही काश्मिरमध्ये पंडितांवर हल्ले झाले. याचा फायदा घेऊन प्रचार केला गेला. पण कोल्हापुरकरांनी भाजपच्या चुकीच्या प्रचाराला योग्य उत्तर दिले’ असंही पवार म्हणाले.

‘चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाणार असं सांगितलं होतं. पण, तुम्ही कोल्हापूर लोक हुशार, तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला. मी ऐकून होतो की, बरेच दिवस  संघाच्या शाखेत गेल्याचे ऐकून होतो. शब्दाला पक्का असल्याचे सांगितले होते. ही घोषणा केल्यानंतर निकाल लागला, त्यामुळे माझी काळजी वाढली. चंद्रकांत पाटील हे हिमालयात निघाले की नाही, त्याच्या पाठीमागे जयंत पाटील निघाले की काय असं झालं होतं. पण जयंत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील एकदा हिमालयात जाऊन बसले की मी शांतपणे परत येईन, असं म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली.

आज ज्यांच्याकडे देशाची सत्ता आहे. त्यांची मला गंमत वाटते, तिथे जगातील नेते येतात. पंडीत नेहरूंचा काळ पाहिला, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचा काळ पाहिला. जगातील नेते आल्यानंतर ते साहजिक दिल्लीत जातात. केंद्र सरकार त्यांचे दौरे देशभरात करत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले ते गुजरातला गेले. मला त्याचा आनंद आहे. चला शेजारच्या राज्यात गेले. चीनचे राष्ट्रपती आले गेले कुठे गुजरातला. आज दोन दिवसांपूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान आले ते गुजरातला गेले. गुजरातबद्दल आमची काही वेगळी भावना नाही. पण देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांनी देशातील इतर घटकांचा विचार केला पाहिजे.

जर राज्याचे मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर गावात रस्ते सुधारले जातात, गावाचे रुप पालटले जाते. मग गुजरातमध्ये देशातील नेते जात असतील तर तो संदेश चुकीचा जात आहे. हा निर्णय देशाच्या हिताचा नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: