कोरोनाबाधित मोक्काआरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

शहरातील एका ज्वेलर्स व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत दीप्ती काळेच्या टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अटक करून तिच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास तिने बाथरूमच्या काचा काढून खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरून पडल्याचे तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिप्ती सरोज काळे (रा. ज्ञाती इक्वोटेरियम, बावधन) असे पडून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. काळे आणि निलेश उमेश शेलार यांना विश्रामबाग पोलिसांनी ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. तिच्यावर सोमवारी आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मंगळवारी दीप्तीसह तिच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली होती. तिला अटक केल्यानंतर उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. ससूनच्या आठव्या मजल्यावर उपचार सुरू असताना दीप्तीr अंघोळीच्या बहाण्याने बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी गार्ड बाथरूम बाहेरच थांबला होता.

तब्बल 20 मिनिटे झाल्यानंतरही दीप्ती बाहेर आली नाही. त्यामुळे गार्डने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बाथरूममधील खिडकीच्या काचा काढून ठेवल्याचे दिसून आले. गार्डने खाली डोकावून पाहिले असता, डक्टमध्ये महिला जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी खात्री केल्यानंतर जखमी महिला दीप्ती काळे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, अटकेत असताना दीप्ती काळेचा मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र : मुंबई क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा –एकनाथ शिंदेनिर्बंध कालावधी वाढणार का? मोफत लस मिळणार काय? आज फैसलालसस्वी भव! महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी!! दीड कोटी लोकांचे लसीकरणकोरोनाला कोणीही हरवू शकतो! एक दिवसाच्या बाळाची कोविडवर मातकेईएम आणि वाडिया रुग्णालयाला एक कोटीचा निधी, आमदार अजय चौधरी यांच्या प्रयत्नांना यशपोलिसाला वाहनाने धडक देऊन फरफटत नेले, अंधेरी परिसरातील घटना
ससून रूग्णालयात उपचारादरम्यान आरोपी दीप्ती काळे हिने बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाईपावरुन तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता, खाली पडून तिचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त, झोन दोन

टोळीवर मोक्कानुसार कारवाई
सराईत दिप्ती काळेने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली होती. त्यामध्ये प्रत्येक गुन्हयामध्ये वेगवेगळ्या साथीदारांनी मागील १० वर्षांत कट रचून खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी, बनावट व्हिडीओ तयार करुन संगणकाचा वापर करून अपलोड करण्याचे असे अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. टोळीप्रमुख दिप्ती काळे आणि टोळीकडून बेकायदेशीर कृत्य सातत्याने सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचेविरुध्द मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती.

खंडणीचा दाखल झाला गुन्हा

दीप्ती काळे हिने एका बांधकाम व्यावसायिकासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्या बदल्यात तिने 3 कोटी रुपयांची 42 गुंठे जमीन नावावर करून घेतली. त्याशिवाय उरलेली 58 गुंठे नावावर करून दे, नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी तिने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिली. या प्रकरणात इतर साथीदारांनी महिलेच्या पतीला मारहाण केली आहे. याप्रकरणी दीप्ती काळे, नीलेश शेलार, नितीन हमने यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: