दरेकर म्हणाले राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार तर त्यांच्या टीकेला अजित पवार म्हणतात की…

 

मुंबई | मुंबई बँक घोटाळ्याप्रकारणावरून बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार म्हणाले की, ‘जर पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी. सरकारच्या आदेशाने चौकशी यंत्रणा चौकशी करतील. त्यातून पुढे जे निष्पन्न व्हायचं ते होईल’, असं म्हणत प्रवीण दरेकर यांचं आव्हान परतावून लावलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. यावेळी एमपीएससी, सैन्य भरती, ओबीसी आरक्षण, मुंबै बँक चौकशी यासह आदी विषयांवर अजित पवारांनी आपली रोखठोक मतं मांडली. तसंच विरोधकांच्या आरोपांना जशास तशी उत्तरही दिली.

काय म्हणाले होते दरेकर
पुणे जिल्हा बँकेत महाभ्रष्टाचार आहे. त्याची तक्रार ईडी, सीबीआय आणि केेंद्र सरकारकडे करणार असल्याचं विधान दरेकरांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच राज्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांच्या देशील तक्रारी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं दरेकर म्हणाले. दरेकरांच्या प्रश्नांवर अजितदादांनी रोखठोक उत्तर दिली.

Team Global News Marathi: