“.डर के माध्यम से शोषण किया जाता है”, संजय राऊतांचे सूचक ट्वीट

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने ईडीच्या समन्सनुसार चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याने ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी ईडीकडे केली. मात्र ईडीने ही मागणी मान्य न करता २७ जुलै रोजी हजर राहण्याचे नवे समन्स बुधवारी जारी केले.

या पार्श्वभूमीवरच संजय राऊत यांनी आज केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. “मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है”, जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यापूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली असून भाजपकडून आता संजय राऊतांचा नंबर असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी ईडीने संजय राऊत यांची १ जुलै रोजी १० तास चौकशी केली होती. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून ईडीने संजय राऊत यांना बुधवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सध्या संसदेच्या अधिवेशनामुळे राऊत दिल्लीत आहेत. आता राऊत यांना २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल मला पूर्ण आदर असून, त्यांना चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अन् आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या भरपावसात घेतली सभा

चित्रा वाघ यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट; तर पटोले कोर्टात

Team Global News Marathi: