दापोलीतील वादग्रस्त रिसॉर्ट अनिल परबांचा कसा? किरीट सोमय्यांनी दिली माहिती

 

भाजपचे नेते खासदार किरीट सोमय्या अनिल परब यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्ट प्रकरणी आक्रमक झाले आहेत. सदानंद कदम यांनी हायकोर्टात रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेली याचिका खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. खोटी याचिका दाखल करून सदानंद कदम हायकोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे सोमय्यांनी म्हटले.

सदानंद कदम हे रिसॉर्टचे मालक असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. तर, सोमय्यांच्या दाव्यानुसार दापोलीतील साई रिसॉर्ट हे कदम नव्हे तर अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक झाले होते.

अनिल परब यांनी आपला या रिसॉर्टशी संबंध नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. परब यांच्या दाव्यानुसार, सदानंद कदम यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट आहे. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सदानंद कदम यांची याचिका खोटी आणी दिशाभूल करणारी आहे. हायकोर्टाचा वेळ महत्वाचा आहे. खोट्या याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचं काम सदानंद कदम करत असल्याचे त्यांनी म्हटले.

सोमय्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जुलै, 2018 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथपत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे घोषित केले होते. मूळ जमीन मालक विभास साठे यांच्याकडून एक कोटी रुपये देऊन दापोली रिसॉर्टची मुरुड गावातली जमीन विकत घेतले असल्याचे अनिल परब यांनी आपल्या निवडणुकीच्या मालमत्ते मध्ये नमूद केले होते असे सोमय्यांनी सांगितले होते.

Team Global News Marathi: