“दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा खोतकरांचा शब्द “

 

अर्जुन खोतकर अजूनही शिवसेनेतच आहेत असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. “दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा शब्द अर्जुन खोतकरांनी दिला होता,” असा दावाही राऊत यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा केली होती असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

राऊत म्हणाले की, खोतकर मला फोनवर बोलले होते की या रावसाहेब दानवे यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला निवडणूक लढेन आणि रावसाहेब दानवेंना मी कायमचं घरी बसवेन. रावसाहेब दानवे यांच्याविषयी त्यांनी जे शब्द आणि वक्तव्ये केलेली आहेत, त्याचा उच्चार मी इथे करणार नाही.

तसंच मला खात्री आहे अर्जुन खोतकर यांची गेल्या काही दिवसातील शिवसेनेच्या व्यासपीठावरील भाषणं ऐकली तर मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल आणि अर्जुन खोतकर अजूनही शिवसेनेत आहेत. ते स्वत: समोरुन सांगत नाही तोपर्यंत ते शिवसेनेत आहेत आणि ते शिवसेना सोडणार नाहीत.

दरम्यान अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या घरी पोहोचले आहेत. दानवेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून खलबतं सुरु आहेत. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब यांच्यात राजकीय वैर आहेत. पण शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीने दोन्ही नेत्यांमध्ये गोडवा आणल्याचं म्हटलं जातं. अर्जुन खोतकर यांनी अद्याप शिंदे गटाला समर्थन दिलं नसलं तरी ते याच वाटेवर असल्याचं म्हटलं जातं आहे.

अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला”

शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण

Team Global News Marathi: