बापरे ! अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 459 जण कोरोना पॉझिटिव्ह; 3114 जणांवर उपचार सुरू


अहमदनगर । अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हयात गेल्या 24 तासात तब्बल 459 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार 260 वर पोहचली आहे.

सध्या जिल्हयात 3 हजार 114 रुग्णांवर उपचार सुरू असून; 8 हजार 993 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 153 जणांना जीव घेतला आहे. नगरमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून, वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: