सिलेंडर मॅन सागर जाधव दिसणार प्रवीण तरडेंच्या आगामी चित्रपटात |

 

एखाद्या बड्या अभिनेत्याला लाजवेल असा देखणा चेहरा आणि पिळदार शरीरयष्टीमुळे सागर सोशल मीडियावर इतका लोकप्रिय झाला सिलेंडर मॅन संगर जाधव याने चित्रपटात काम करावं, असं अनेकांना वाटू लागलं होत. त्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होताना दिसून येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रवीण तरडे यांनी सागरला त्यांच्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याचं आश्वासन दिलं आहे.

सागरचे फोटो सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तुषार भामरेने एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. त्यावेळेस तुषारने सागरबद्दल अनेक गोष्टीचा उलगडा केला. तुषारच्या म्हणण्यानुसार, सागर त्याला पहिल्यांदा दिसला तेव्हा तुषार त्याच्या पत्नीसोबत चष्मा खरेदी करण्यासाठी गेला होता. सिलेंडरच्या गाडीजवळ विचारमग्न अवस्थेत उभ्या असलेल्या सागरचे तुषारने दोन फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले.

खरं तर, सागरचा लुक तुषारलाही आवडला होता. सागरचे फोटो पोस्ट करताना तुषारच्या हे ध्यानीमनी देखील नव्हतं की सागर रातोरात स्टार होईल. तुषारने सांगितल्याप्रमाणे, सागरला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर तुषारने सागरशी संपर्क साधला. मात्र न विचारला त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याबद्दल सागरची माफी मागितली. उलट सागरने मात्र तुषारचे आभारच मानले आहे.

Team Global News Marathi: