क्राईम पट्रोलचा ‘श्रद्धा वालकर’ एपिसोड डिलीट; ‘सोनी’ने मागितली माफी

 

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जवळपास ७ महिन्यांपूर्वीच आफताब पुनावालाने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरचे तुकडे करुन जंगलात फेकले. या प्रकरणाचा तपास अजुनही सुरुच आहे. तर दुसरीकडे सोनी टीव्हीने ‘क्राईम पेट्रोल’च्या एका एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच गोष्ट दाखवली आणि मात्र या एपिसोड नंतर सोनी टीव्हीवर लोक संतापले. हा वाद एवढा वाढला की आता सोनीने माफी मागत तो एपिसोड डिलीट केला आहे.

‘सोनी टीव्ही’वर दाखवण्यात आलेल्या एपिसोड मध्ये मुलगा हिंदू दाखवला असून मुलगी ख्रिश्चन दाखवण्यात आली आहे. आफताबने ज्याप्रकारे श्रद्धाची हत्या केली अगदी तशीच घटना एपिसोड मध्ये दाखवण्यात आली आहे. यावरुन लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रेक्षक म्हणाले, मेकर्सने श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ना फक्त मोडतोड करुन दाखवले पण यातील नावंही बदलले. हा एपिसोड ट्विटरवर व्हायरल झाला. सोनी वाहिनी बॉयकॉट करण्याचीही मागणी होऊ लागली. हिंदूंना जाणूनबुजून बदनाम करण्यात आल्याने संघटना आक्रमक झाल्या.

सोनी वाहिनीने घडलेल्या प्रकाराबाबत लिहिले, ‘क्राईम पेट्रोलच्या नुकताच प्रसारित केलेला एक एपिसोड सध्या चर्चेत असलेल्या एका घटनेशी मिळताजुळता आहे. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, एपिसोडमध्ये दाखवलेली गोष्ट ही २०११ च्या एका घटनेवरुन घेतलेली आहे. याचा सध्याच्या घटनेशी संबंध नाही. प्रसार माध्यमांसाठी घातलेल्या नियमांच्या अधीन आम्ही काम करु याची खात्री देतो. प्रेक्षकांची नाराजी बघता आम्ही हा एपिसोड काढत आहोत, जर या एपिसोडमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असे माफीनाम्यात म्हंटले आहे.

 

Team Global News Marathi: