कंगनाच्या अडचणीत वाढ कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना दिले आदेश
सिनेभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश बांद्रा कोर्टाने मुंबई पोलिसांना दिलेले आहे. या आदेशामुळे अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणीत वाढ झालेली बघायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसर्किट केले आहे.
बांद्रा कोर्टात कंगना राणावत हिच्या वक्त्यव्य विरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम अभिनेत्यांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट आणि वक्त्यव्य करत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाची पायरी चढणे पसंद केले होते. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यानंविरोधात विरोधात बेताल वक्तव्य करत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटाव, मंत्री मंडळात झाली चर्चा