कोरोनाचे थैमान : उस्मानाबादेत एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंकार 

कोरोनाचे थैमान : उस्मानाबादेत एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंकार 

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे आज  ८ मृतदेहांवर अंत्यसंकार 

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या ७२ तासात २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी सात तर बुधवार दि. १४ एप्रिल रोजी १४ जणांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला.

त्यामुळे उस्मानाबादच्या कपिलधारा  स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळाले आहे. एकाचवेळी  १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे ८ मृतदेहांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.  कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत.

उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.बुधवारी एकाच वेळी १९मृतदेहांवर अंत्यसंकार  करण्यात आले.  हे चित्र पाहून स्मशानभूमी देखील गहिवरली असेल .

साभार उस्मानाबाद लाईव्ह

ग्लोबल न्युज नेटवर्क: