कोरोनाची दुसरी लाट आहे, दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊ नका – छगन भुजबळ

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवता दिसत आहे. त्यात राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मिनी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. त्यातच नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा भुजबळ यांनी नाशिकरांना दिला आहे.

“दुर्दैवाने कोरोनाची दुसली लाट आली हे नक्की आहे. नाशिकला १० हजार ८०० कोरोना रुग्ण आहेत. यंत्रणा कामाला लागलेली आहे. १५ मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर ४१ टक्के होता, आता तो ३२ टक्क्यांवर आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात ५ हजार स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे. रोज २० हजार तपासण्या होण्याची क्षमता आहे. पण लोक तिथपर्यंत गेले तरच उपयोग होणार आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: