कोरोनाचा मानवी मानसशास्त्रावर होणारा परिणाम ! वाचा सविस्तर-

कोरोनाचा मानवी मानसशास्त्रावर होणारा परिणाम ! वाचा सविस्तर-

कोरोना व्हायरस हा पूर्ण देशभर किंवा जगभर पसरलेला असा हा साथीचा रोग आहे. तसेच आपण त्याला महामारी सुद्धा म्हणू शकतो. कोरोनामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता दुबळी होते हे आपल्या सर्वांना माहित आहे.

म्हणजेच कोरोना हा एक शरीर शास्त्रीय आजार आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु हे एक मानसिक संकट सुद्धा आहे, असे म्हणायला आता काही हरकत नाही. म्हणजेच आजाराचा शरीरशास्त्रीय परिणाम आता मानसशास्त्रावर होताना आणि बळावताना आपण अनुभवतो आहोत.

 

हा मानसशास्त्रीय परिणाम कसा काय ?

याची महत्वाची कारणे म्हणजे, एकाकीपणामध्ये राहण्याचे वाढलेले मोठे प्रमाण, दैनंदिन जीवनामध्ये झालेला बदल, नोकरी गमाविल्याचं नैराश्य किंवा नोकरी गमाविण्याची भीती, प्रिय व्यक्तींच्या मृत्यूबद्दल निर्माण झालेली आर्थिक अडचण आणि दुःख, मृत्यूबद्दल वाढलेली भीती, जगण्याचा कमी झालेला आशावाद ई.

वरील हि महत्वाची कारणे मानवी मानसशास्त्रावर गंभीर परिणाम होण्याची स्पष्टता देतात.

या महामारीच्या काळात माणसांना एकमेकांना समजून घेण्याची गरज हि वाढलेली आहे. इतरांशी संपर्क साधने आणि मन मोकळं करणे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती येण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. कारण पॅनिक अटॅक, आत्महत्येची चिन्हे, डिप्रेशन यांची लक्षणे एकाच ठिकाणी राहून-राहून वाढलेली आहेत.

म्हणून हि लक्षणे आपल्या सर्वांना समजून घेणे महत्वाचे आहे. जे इतरांसाठी फायद्याचे असतीलच परंतु स्वतःसाठी सुद्धा ते उपयोगी पडू शकेल.

ती मानसशास्त्रीय लक्षणे पाहूया…

 

चिंतेची लक्षणे

♦ अति विचार करणे, एखाद्या प्रसंगांबद्दल अतिभावनिक वर्तन ठेवणे.

♦ स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याविषयी अतिकाळजी करणे आणि घेणे. तसेच काहीतरी वाईट होणार याबद्दल सतत बोलत राहणे.

♦ अस्वस्थ वाटणे आणि प्रचंड चिडचिड होणे.

♦ एका ठिकाणी लक्ष एकाग्र करण्यास अडथळा येणे, झोपेच्या समस्या आणि विचित्र स्वप्न.

पॅनिक अटॅकची लक्षणे

 

♦ घाम येणे, अंग थरथरणे, सामान्यपणे श्वास न घेता येणे आणि घुटमळल्यासारखी स्थिती निर्माण होणे.

♦ हृद्य जोरजोरात धडधडणे, त्यामुळे भीतीची भावना निर्माण होणे.

♦ काही लक्षणे कोणतीही पूर्वकल्पना न देता सुद्धा येऊ शकतात. जसे भोवळ येणे, चक्कर येणे, डोक्याची एक बाजू दुखू लागणे.

♦ ज्या व्यक्तींना एकदा अटॅक येऊन गेला आहे त्यांना पुढचा अटॅक कधी येतोय याबद्दल धडकी भरून येते, सामान्य विचार करता येत नाहीत.

डिप्रेशनची लक्षणे

♦ दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कामांमध्ये नावड निर्माण होणे, तसेच त्या कामातून समाधान न घेता येणे.

 

♦ कमालीचे वजन घटने. कोणत्याही अन्न पदार्थाची चव न येणे.

♦ प्रचंड प्रमाणात झोप लागणे किंवा काही केसेसमध्ये तर अजिबात झोप न लागणे.

♦ आपण कुठल्याच उपयोगाचे नाही, अशी भावना निर्माण होणे, तसेच सतत अपराधीपणाची भावना.

 

♦मृत्यूचे विचार वारंवार येत राहणे किंवा आत्महत्येचे विचार मानत येत राहतात.

आत्महत्येची लक्षणे

♦ सतत आत्महत्येबद्दल बोलत राहणे, किंवा स्वतःच्या शारीरिक नुकसानाबद्दल बोलत राहणे.

♦ एखाद्याचा बघितलेला मृत्य, घटस्फोट, मित्र-मैत्रीणींबद्दल आवड कमी होणे, छंद बद्दल शून्यात येणे.

♦ दुःखाची भावना, चिडचिडेपणा यांसारखे अनेक होणारे व्यक्तिमत्वात बदल.

♦ वागण्यात बदल, झोपेच्या वेळेंमध्ये बदल आणि जेवणाच्या सवयीमध्ये बदल.

 

♦ त्रास देणारे वर्तन, स्वतःला किंवा इतरांना त्रास देणे.

♦ स्वतःविषयी असणारा आदर कमी होणे, कुचकामीपणाची भावना वाढणे, पच्छाताप होणे.

♦ जीवनाबद्दल कोणताही आशावादी दृष्टिकोन नसणे, अशा विश्वास ठेवणे, जसं कि आता काहीच बदलू शकत नाही, हे असंच राहणार.

 

चिंता, डिप्रेशन, पॅनिक अटॅक आणि आत्महत्या अशी माणसे आपण कसे ओळखावे याबाबत आपण वरील मार्गदर्शन इतरांना सुद्धा करू शकता. तसेच हा लेख जास्तीत जास्त शेअर करू शकता.

साभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: