कोरोनामुळे होते बाधित : एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
ग्लोबल न्यूज: आज बुधवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे (वय65) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश अंगडी यांना कोरोनाची बाधा झाली होती. आणि त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. या बातमी नंतर कर्नाटकात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटवरून अंगडी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सुरेश अंगडी यांना 11 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ट्विटरवर त्यांनी ही माहिती दिली होती. तसेच आपली प्रकृती सध्या स्थिर आहे, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते.
दरम्यान, सडक निर्माण मंत्री नितीन गडकरी, आप चे नेते मनीष सिसोदिया यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्लीत खळबळ उडाली आहे.
बेळगाव येथून 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या अंगडी याना 2019 साली रेल्वे राज्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. संसदीय पावसाळी अधिवेशनासाठी सुरेश अंगडी दिल्लीलाही गेले होते. दरम्यान दिल्लीला त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कर्नाटक राज्याला आणि प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्याला जबर धक्का बसला आहे.
महाराष्ट्राबद्दल बोलणाऱ्यांचे पुढचे पाऊल राजकारणात पडते- संजय राऊत