कोरोना अपडेट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग चार पट जास्त – राजेश टोपे

कोरोना अपडेट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग चार पट जास्त – राजेश टोपे

ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच, आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो हे एक चांगलं आहे, असं राजश टोपे म्हणाले. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीच्या आधी राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आजच्या बैठकीत कोरोनाच्या नव्या रुपावर चर्चा होणार आहे. ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो. लसीचा या व्हेरियंटवर परिणाम होतो की नाही? हे पाहावं लागणार आहे. मी केंद्राला दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची यादी काढली जात आहे. या देशातून येणारी विमानं थांबवली पाहिजेत. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतं. या मागणीवर सध्या काही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड-१९ च्या नव्या रुपाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक (IG), पोलीस आयुक्त/ जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिव्हील सर्जन, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता(Dean), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा टास्क फोर्सचे २ प्रतिनिधी असणार आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: