All Is Well पण..कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी विलगीकरणाच्या निर्देशाचे पालन करावे-तुकाराम मुंडे यांचे आवाहन

कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना मी कोरोना पॉझिटिव्ह

आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण, फसेबूक पोस्टवरून मुंडे यांची माहिती

माजी नागपूर मनपा आयुक्त तथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांना
कोरोना संसर्गाची लागण झाल्याची माहिती खुद्द आयुक्त मुंडे यांनी फेसबुक वॉलवरून दिलेली आहे. यावेळी त्यांनी जनतेला कळकळीचे आवाहन कले आहे.

कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मी शासनाच्या सर्व गाईडलाइनन्स पळत आहे. तुम्ही सर्वांनी देखील गृह विलगीकरणाच्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन तुकाराम मुंडे यांनी केले आहे.

आयुक्त तुकाराम मुंडे आपल्या वॉलमध्ये लिहितात की, All is Well…!मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे.

मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे.

आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: