ग्लोबल न्यूज : पुणे शहरात आज, गुरुवारी नव्याने 2 हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 26 हजार 549 इतकी झाली आहे. दरम्यान, शहरात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
शहरातील 885 कोरोना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात . त्यामुळे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 4 हजार 670 झाली आहे.
पुणे शहरात आज एकाच दिवसात 11 हजार 835 नमुने घेण्यात आले. आजपर्यंतची एकूण टेस्ट संख्या आता 12 लाख 86 हजार 761 इतकी झाली आहे.
दिवसभरात नवे २ हजार ७५२ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने २ हजार ७५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख २६ हजार ५४९ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 18, 2021
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 002 इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 16 हजार 877 रुग्णांपैकी 440 रुग्ण गंभीर तर 846 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.