कोरोना हा प्राणी, भाजपच्या माजी मुख्यत्र्यांचा शोध !

सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. आज कोरोनामुळे अनेकांना आपला प्राणही गमवावा लागत आहे. मात्र दुसरीकडे कोरोना संदर्भात वादग्रस्त विधान करून भाजपा नेते आणि मंत्री आपल्या आणि पक्षाच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गोमूत्र पिल्याने तसेच अंगाला गोमातेचे शेण लावल्याने कोरोना जातो असे विधान भाजपा नेत्यांनी केले होते आता त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्र्याने चक्क कोरोनाला प्राणी म्हणून संबोधले आहे.

उत्तराखंडमधील भाजपचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान करून देशाच्या दुःखावर मीठ चोळले. कोरोनाही एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत त्यांनी जीवघेण्या विषाणूविषयीचा पोटातील कळवळा जगजाहीर केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपात नेते पुढारी कमी आणि वैज्ञानिक जास्त असेच चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. सध्या त्यांचे हे विधान सोशल मीडियात चांगलेच ट्रोल झाले आहे.

आपण आपल्यालाच सर्वाधिक बुद्धिमान प्राणी समजत आहोत. आपण कोरोनाच्या मागे लागलो आहोत. परंतु विषाणूला जगायचे आहे. त्यामुळे तो वेळोवेळी रूप बदलत आहे. कोरोना बहुरुपी आहे. परिणामी, आपल्यालाच विषाणूपासून अंतर ठेवून चालावे लागेल, तेही वेगाने. जेणेकरून कोरोना विषाणू मागे राहील, असे विधान त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे.

Team Global News Marathi: