राज्यात कोरोनाचा विस्फोट- दिवसभरात आढळले 41 हजारापेक्षा जास्त रुग्ण; 13 जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४१ हजार ४३४ रुग्ण; राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४१ हजार ४३४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ९ हजार ६७१ कोरोना रुग्ण बरे झाले.

राज्यात आतापर्यंत आढळलेल्या १००९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ४३९ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३ लाख ४२ हजार १७३ कोरोना चाचण्यांपैकी ६८ लाख ७५ हजार ६५६ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६८ लाख ७५ हजार ६५६ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ५७ हजार ८१ बरे झाले.

कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ६२७ मृत्यू झाले तसेच ३७१० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ८ लाख ४५ हजार ८९ होम क्वारंटाइन तर १८५१ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७७ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.३७ टक्के आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: