कोरोना वाढतंच आहे: राज्यात रविवारी 68,631 नवे कोरोना रुग्ण, 503 मृत्यू

ग्लोबल न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 68 हजार 631 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 लाख 39 हजार 338 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 31 लाख 06 हजार 828 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 45 हजार 654 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.92 टक्के एवढं झाले आहे.

 

चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 70 हजार 388 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 60 हजार 473 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 36 लाख 75 हजार 518 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 529 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 38 लाख 54 हजार 185 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३८,३९,३३८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१ मुंबई मनपा ८,४६८

२ ठाणे १,१४९

३ ठाणे मनपा १,६६९

४ नवी मुंबई मनपा ९८१

५ कल्याण डोंबवली मनपा १,५१८

६ उल्हासनगर मनपा १७९

७ भिवंडी निजामपूर मनपा ७९

८ मीरा भाईंदर मनपा ४५१

९ पालघर ५८७

१० वसईविरार मनपा ८०९

११ रायगड १,००४

१२ पनवेल मनपा ७३८

१३ नाशिक १,७११

१४ नाशिक मनपा २,०४९

१५ मालेगाव मनपा २५

१६ अहमदनगर २,५८२

१७ अहमदनगर मनपा ८९४

१८ धुळे २३६

१९ धुळे मनपा १०२

२० जळगाव १,२७२

२१ जळगाव मनपा २९८

२२ नंदूरबार ४३०

२३ पुणे ३,४०२

२४ पुणे मनपा ६,५४१

२५ पिंपरी चिंचवड मनपा २,७३२

२६ सोलापूर १,२३६

२७ सोलापूर मनपा २७०

२८ सातारा १,४०६

२९ कोल्हापूर ४१२

३० कोल्हापूर मनपा १६७

३१ सांगली ८०६

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३४

३३ सिंधुदुर्ग ३३९

३४ रत्नागिरी ३०६

३५ औरंगाबाद ६३२

३६ औरंगाबाद मनपा ७८३

३७ जालना ८६७

३८ हिंगोली २७९

३९ परभणी ५८१

४० परभणी मनपा २७६

४१ लातूर १,३७३

४२ लातूर मनपा ४१२

४३ उस्मानाबाद ७१५

४४ बीड १,१५७

४५ नांदेड ८८४

४६ नांदेड मनपा ३८०

४७ अकोला २०१

४८ अकोला मनपा ३१४

४९ अमरावती ४८९

५० अमरावती मनपा ३६१

५१ यवतमाळ ९३१

५२ बुलढाणा ५३

५३ वाशिम ३७८

५४ नागपूर २,४३५

५५ नागपूर मनपा ४,७२४

५६ वर्धा ९५८

५७ भंडारा १,२२२

५८ गोंदिया ७४४

५९ चंद्रपूर १,१८६

६० चंद्रपूर मनपा ५६३

६१ गडचिरोली ६५१

एकूण ६८,६३१

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६५ मृत्यू, अहमदनगर– ४५, जळगाव- ३२, पुणे- ३१, नागपूर- ११, ठाणे- ९, यवतमाळ- ८, परभणी– ६, नांदेड- ५, नंदूरबार– ४, औरंगाबाद– ३, भंडारा– २, नाशिक- २ रायगड- २, अकोला- १, लातूर- १ उस्मानाबाद- १, सांगली- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

ग्लोबल न्युज नेटवर्क: